मुंबई- आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना राज्य सरकारने ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी नवीन योजनांची घोषणा केली आहे. ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या आणि विशेष मागास प्रवर्ग समाजासाठी ६१९.५० कोटींच्या योजनांचा प्रस्ताव मंजूर केला असल्याची माहिती इतर मागास वर्ग विभागाचे मंत्री राम शिंदे यांनी दिली. आज (मंगळवारी) पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मराठा समाजापाठोपाठ
दलित समाजासाठी योजनांची घोषणा केल्यानंतर ओबीसी समाजातून नाराजीचा सूर वाढला
होता. त्यामुळे ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी योजनेच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली
आहे.
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष
मागास प्रवर्ग कल्याण विभागांर्तगत येणाऱ्या महामंडळांना विविध योजना
राबविण्यासाठी ७३६.५० कोटी रुपयांचे सहाय्यक अनुदान देण्यासही राज्य मंत्रिमंडळाने
मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली.